विविध मागण्यासाठी खाजगी शिक्षक संघटनेने दिले शिक्षणाधिकारी यांना निवेदन
वसमत (प्रतिनिधी)
शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ हिंगोलीच्या वतीने शिक्षणाधिकारी सोनटक्के यांना निवेदन देण्यात आले
दिनांक २७ सप्टेंबर२०२४ रोजी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकतेर महासंघ शाखा हिंगोली च्या वतीने जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नावर जिल्हा शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात
थकित वेतना संबंधित जावक रजिस्टर ची छायांकित प्रत त्वरित मिळावी,
नवीन वेतन अधीक्षक प्राथमिक यांची लवकर शिफारस करण्यात यावी,
जिल्ह्यातील संच मान्यता कॅम्प लावून लवकरात लवकर संच मान्यता देण्यात यावी ,
ज्या शिक्षकांची मेडिकल बिले प्रलंबित आहेत ते त्वरित निकाली काढावे,
सेवानिवृत्त शिक्षकांचा फाईल त्वरित निकाली काढाव्यात,
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या शाळेची कर्मचारी संख्या चार पेक्षा जास्त आहे तिथे एक युवा प्रशिक्षणार्थी देण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या सदरील निवेदनावर साडेचारशे ते पाचशे शिक्षकांच्या स्वाक्षरी आहेत. याप्रसंगी शिक्षणाधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली लवकरच शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी दिले यावेळेस जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक संघटना शाखा हिंगोली प्रमोद भोकरे, कोषाध्यक्ष चव्हाण एस पी, यंबल सर ,फैयाज सर ,गायकवाड सर,गवळी सर चव्हाण सर पद्मे सर, जगताप सर, तवर सर, वांजुळकर सर, राठोड सर ,बेंडे सर ,भातनासे सर, असोले सर, पवार सर,कदम सर,रोडगे सर,वाढवे सर,चोपडे सर, सर क्षीरसागर सर,फडणवीस मॅडम,गव्हाणे मॅडम व शिक्षक व शिक्षकेतर बांधव उपस्थित होते.