शेतीक्षेत्रात दिशादर्शक कामगिरी करणाऱ्या शेतकरी तसेच शेतकरी पुत्रांचा सन्मान
आखाडा बाळापूर (प्रतिनिधी)
विगोर बायोकेमीकल प्रा.लि.इंदौर या बियाणे कंपनीच्या नांदेडमध्ये मालविका या सोयाबीन वाणाचा पिक पाहणी कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत भारतीय क्रिकेट टीमचे वर्ल्ड कप विजेते कर्णधार पद्मभूषण कपिल देव यांच्या हस्ते शेतीक्षेत्रात दिशादर्शक कामगिरी करणाऱ्या शेतकरी तसेच शेतकरी पुत्रांचा सन्मान करण्यात आला यामध्ये डोंगरकडा येथील उत्कृष्ट शेतकरी पुत्र पराग पाटील अडकिने, व मौजे.सालापुर येथील प्रगतिशील शेतकरी सखारामजी पांडव यांचा समावेश असून प्रगतिशील शेतकरी व शेती पुत्राचा या सन्मानाबद्दल यांचा सत्कार
डॉ.संतोषर बोंढारे ,सोपान पाटील बोंढारे,संतोष पटील हेंर्द्रे,प्रशांत पाटील जाधव,गजाननसिंह बायस, यांच्यावतीने करण्यात आला यावेळी बाळासाहेब गावंडे पाटील, किशनराव गावंडे पाटील,गजाननराव गावंडे पाटील,प्रल्हादराव अडकिणे पाटील,पंकज पाटील अडकिणे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी नागरिक उपस्थित होते.