शेती नावावर करण्याच्या कारणावरून एकास मारहाण
दोन महिला व एक आरोपी विरोधात गुन्हा दाखल वालूर
वालूर(प्रतिनिधी बिलाल तांबोळी )
शेती नावावर करण्याच्या कारणावरून एका इसमाला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली ही घटना सेलू तालुक्यातील वालूर येथे घडली सदरील प्रकरणी दोन महिला सह एक जनावर 27 सप्टेंबर रोजी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी ही तालुक्यातील वालूर येथे आरोपीनी संगणमत करत अतुल सूर्यभान पांढरे वय 40 वर्ष यांना त्यांच्या नावावर असलेली शेती सोनाली अतुल पांढरे यांच्या नावावर करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात सोनाली पांढरे हिने अतुल पांढरे यांना शिवीगाळ केली सोनाली यांच्यासोबत असलेल्या यमुनाबाई आश्रोबा बेंगाळ आश्रुबा राजाराम बेंगाळ या दोघांनीही शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली लोखंडी शिलाई मशीन अतुल पांढरे यांच्या डोक्यावर मारत दुखापत करण्यात आली सदर प्रकरण सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोनी दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना गुलाब राठोड करत आहे.