काँग्रेसने केला रास्ता रोको आंदोलन
परभणी(प्रतिनिधी)
सोयाबीन व कापूस पिकांच्या 25 टक्के अग्रीम पीक विमा तत्काळ मंजूर करावा, या प्रमुख मागणीसाठी परभणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पेडगाव फाट्यावर सोमवार 30 सप्टेंबर रोजी सकाळी दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब रेंगे यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
2021 खरिपाचा विमाही वंचित शेतकऱ्यांना तत्काळ देण्यात यावा, यासह अन्य मागण्या साठी हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रधानमंत्री पीकविमा योजना जिल्हास्तरीय संयुक्त समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, प्र.मं.पि.वि. योजनेतील तरतुदीनुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकुल परिस्थितीमुळे असलेल्या पिक नुकसानी बाबत 25% अग्रिम पिक विमा भरपाई अदा करावी.
सन 2021 च्या खरीपचा रिलायन्स इन्शुरन्स कंपनी कडील पिक विमा उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा कराव त्या कार्यालयास दिनांक 25 सप्टेंबर रोजी निवेदन तालुका काँग्रेस कमिटीकडून निवेदन देण्यात आले होते. मात्र या निवेदनावर कोणतेही उचित कार्यवाही व दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी रास्तारोको करण्याचा निर्णय घेतला. आजच्या रास्तारोको आंदोलनाची दखल घेऊन जिल्ह्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांची मागणी मान्य करुन शेतकऱ्यांच्या मनातील जिल्हा प्रशासना बद्दलचा असंतोष दुर करुन जिल्ह्यात खरीप 2024 सोयाबीन, कापूस, मुग, उडीद, तुर या सर्व खरीप पिकांचा अग्रीममध्ये समावेश करुन अधिसुचना काढावी.
तसेच खरीप 2021 चा रिलायन्स इन्शुरन्स कंपनीकडील पिक विमा उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्याचा आदेश कृषि विभाग व रिलायन्स इंन्शुरन्स कंपनी यांना द्यावा. तसेच 2021 च्या काही शेतकऱ्यांच्या CSC केंद्रावरील विमा भरलेल्या पावत्या आहेत. परंतू सरकारच्या PMFBY या पोर्टलवर खरीप 2021 ची सद्यस्थिती तपासली असता No Police Fund असा संदेश येत आहे. तरी या समस्येच्या निराकरणा करीता संबंधीत विमा कंपनीचा जिल्हा प्रतिनिधीची तात्काळ नेमणुक करण्यात यावी व शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन करुन नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात यावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब रेंगे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.