मराठवाडा
हिंगोली औंढा रोडवरील शेतात तरुणाची आत्महत्या
हिंगोली (शिवाजी कऱ्हाळे)
हिंगोली औंढा रोडवरील डिग्रस कऱ्हाळे फाटा रोड नजीकच्या शेतात मेथा येथिल तरुण अंकुश मारोती साखरे वय अंदाजे 32 यांनी हिंगोली औंढा रोडच्या नजीकच्या शेतात एका झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मयताचे पाय जमिनीला टेकले असल्याने संशय व्यक्त केल्या जात आहे.
या घटनेचा तपास हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत. आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजलेले नाही.