मराठवाडा

महात्मा गांधी यांचे विचार आजही जगाला प्रेरणादायी – प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी

नूतनचे प्रार्थना गीतांनी महात्म्यास अभिवादन

सेलू : सत्याग्रह, असहकार, अहिंसा ही तत्वे महात्मा गांधी यांनी जगाला दिली. त्यांनी सामान्य माणसाला स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून घेतले. साध्या इतकेच साधनही पवित्र असावे. हि साधनसुचिता अनुसरनाऱ्या महात्मा गांधी यांचे विचार आजही जगाला प्रेरणादायी आहेत. असे प्रतिपादन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त बुधवार ( दि. ०२ ) रोजी नूतन विद्यालयाच्या कै. रा. ब. गिल्डा सभागृहात नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने ‘ वैष्णव जन तो ‘ या उपक्रमांतर्गत महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रार्थना गीतांनी महात्म्यास अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. लोया, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी म्हणाले की, ‘ माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनीही नैतिकता, राष्ट्रनिष्ठा यांचे संस्कार आपल्यावर केली आहेत. प्रेम, अहिंसेचे तत्वज्ञान आपल्या मनात रूजविणाऱ्या या दोन्ही महापुरुषांचे राष्ट्र उभारणीत महत्वाचे योगदान आहे. ‘

नूतन विद्यालयाच्या संगीत विभागातील वैष्णवी पिंपळगावकर, मानसी दलाल, समृद्धी राखे, आर्या घांडगे, दर्शना जोशी, स्नेहल जोगदंड, श्रुती कुलकर्णी, वैष्णवी बोठे, ऋतुजा महाजन, राधिका परदेशी, अथर्व तोडकर, प्रशांत इंगळे, प्रज्योत पांचाळ, आनंद राऊत, अवधूत दहीवाल, कार्तिक सातपुते या गीत मंचच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘ साबरमती के संत ‘, ‘ ईश्वर अल्लाह तेरो नाम ‘ , ‘ वैष्णव जन तो ‘ या प्रार्थना गीतांनी सभागृह भारावून गेले. प्रार्थना गीतांनंतर पाच मिनिटे सर्व श्रोत्यांनी मौन पाळले.

सुत्रसंचलन अतुल पाटील यांनी केले. संगीत संयोजन संगीत विभाग प्रमुख सच्चिदानंद डाखोरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सुखानंद बेडसुरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी केशव डहाळे, अरूण रामपुरकर, रामेश्वर पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेतील घटक संस्था प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button