महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
हिंगोली (शिवाजी कऱ्हाळे)
दिनांक 2 ऑक्टोंबर 2024 या रोजी संत नामदेव प्राथमिक आश्रम शाळा व रतनसिंग नाईक माध्यमिक आश्रम शाळा गांगलवाडी ता . औंढा नाग . जि . हिंगोली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीमान बाळासाहेब श्रीराम पवार साहेब अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष म्हणून माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. ठाकरे पी .व्ही. सर उपस्थित होते. त्याचबरोबर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रथमेश पवार हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमास शिक्षक, वसतीगृह अधिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.