मराठवाडा

जिल्हास्तरीय कलाउत्सवात समुह लोकगीत, व कथाकथनात बहिर्जी विद्यालय प्रथम
हिंगोली (प्रतिनिधी)
हिंगोली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हिंगोली येथे जिल्हास्तरीय कलाउत्सव विविधस्पर्धा नुकत्याच पार पडल्या यात गिरगाव येथील बहिर्जी स्मारक विद्यालयातील समुह लोकगीत गायक स्पर्धेत व कथाकथन स्पर्धेत प्रथम येण्याचा मान पटकावला .
समुह लोकगीत गायन स्पर्धेत लोककवी वामनदादा कर्डक यांचे “तुफानातील दिवे ” तर कथाकथन स्पर्धेत सोनाली ज्ञानेश्वर कऱ्हाळे हीने कथाकार राम तरटे यांची अस्सल गावरान बोलीतील “मुस्तापूरची खीर ” ही कथा सादर करून प्रथम क्रमांक पटकावला हे दोन्ही संघाची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
समुह लोकगीतात वेदिका कदम, सान्वी मारडे , रूद्रानी मारडे, वैष्णवी कऱ्हाळे , राजनंदीनी हनवते, आनुष्का कऱ्हाळे , या विद्यार्थीनींचा सहभाग होता . शुभ्रा लोखंडे हिने एकपात्री अभिनयाने प्रेश्षकाची मने जिंकली . मोबाईलचे साईड इफेक्ट ही मुकनाटीका द्वितीय स्थानावर राहिली यात विवेक नादरे , प्रमोद नादरे , कर्ण नादरे , रुपेश भाग्यवंत , करण नादरे , कस्तुरी नादरे , क्रांती नादरे, तनुजा देशमुख , तनुजा पतंगे , समिक्षा नादरे या विद्यार्थांचा सहभाग होता .
संघाला मार्गदर्शन श्रीनिवास मस्के सर, आशा गायकवाड, अर्चना चवणे यांनी केले . या यशाबद्दल बहिर्जी संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, सचिव पंडीतराव देशमुख , शाळासमितीचे अध्यक्ष शंकरराव कऱ्हाळे , मुख्याध्यापक प्रकाश इंगळे , पर्यवेक्षक चंद्रकात राऊत यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button