मराठवाडा
काँग्रेस पक्षाच्या सेलू शहराध्यक्षपदी रहीम खान पठाण
सेलू (प्रतिनिधी)शहरातील यासेर उर्दु शाळेचे अध्यक्ष तथा सेलू नगर पालिकेचे माजी नगरसेवक रहीम खान पठाण यांची काँग्रेस पक्षाच्या सेलू शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रहीम पठाण यांचा राजकीय अनुभव व दांडगा जनसंपर्क पाहता आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सुरेश नागरे यांच्या शिफारशीनुसार रहीम खान पठाण यांची सेलू शहराध्यक्षपदी
नियुक्ती केली आहे. पठाण हे तीन वेळा सेलू नगर पालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. रहीम खान यांची काँगेस पक्षाच्या सेलू शहर अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.