जि.प.उर्दू शाळेत विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण
जश्नेईदमिलादुनबी निमित्ताने आयोजन
आखाडा बाळापूरः(प्रतीनिधी)
येथील जिल्हा परीषद उर्दू शाळेत जश्नेईदमिलादुनबी निमीत्ताने 30सप्टेंबर सोमवारी विविध स्पर्धा आयोजन करण्यात आले होते यात शाळेतील250विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विजयी विद्यार्थ्यांना गुरुवारी रोख बक्षीस,सन्मान चिन्ह वितरण करण्यात आली.
जश्ने ईदमिलादुन्नबी निमित्ताने मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहोअलैहसलम यांच्या जिवन व शिकवण विषयी भाषण,लेखी परीक्षा तसेच नातशरीफ सादरीकरण,लेखी परीक्षा व प्रश्न मंजुषा स्पर्धा घेतली गेली.250विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमधे मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहोअलैह सलम यांच्या विषयी माहिती करून देणे त्यांनी दाखवलेल्या आदर्श मार्गावर जिवन जगणे,आईवडील, मोठे व गुरूजन सन्मान तथा देशाप्रती प्रेम निर्माण करणे होय.सदर स्पर्धा यशस्वी विद्यार्थ्यांना शाळा समिती अध्यक्ष शेख बशीर अध्यक्षतेखाली व मौलाना अखिल सहाब, देशोन्नती तालुका प्रतीनीधी शेख फारूख गिरगावकर, सय्यद नसीमभाई, शेख जहीर राज,माजीदखान पठाण, शेख नाजील, प्रा.शाळा मुख्याध्यापक सुरेश पांचाळ,कन्याशाळा मुख्याध्यापक रामराव भुरके, मुख्याध्यापक हाशमी सय्यद फसीयोद्दीन प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.
सदर स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या स्पर्धा विजेते विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त मुख्याध्यापक हाजी शेख मुसा गिरगावकर व सेवानिवृत्त केंद्र प्रमुख सय्यद शौकत अली स्मरणार्थ व शाळेतर्फे रोख बक्षीस देण्यात आले यात भाषण गटातून तिसऱ्या वर्गातील प्रथम फातेमा अफरोज शेख, दुसरी आयजा जमीर शेख तर दुसऱ्या गटातून प्रथम कशफ रफिक शेख ,दुसरे अरीबा मोबीन शेख तर नातशरीफ मधे प्रथम अंजूम बाबू शेख दुसरे आयजा अमजद खान तसेच दुसऱ्या गटातून मेहर अंजूम बाबू शेख तर दुसरे आलीया अलीम शेख.
लेखी परीक्षेत प्रथम असिफ अखिल शेख, दुसरे शिफा महबीन सय्यद हमीद, याचप्रमाणे प्रश्न मंजूषा मधे पहिल्या गटात वर्ग तिसरी गट तर दुसऱ्या गटात आठवीवर्ग गटान बक्षीस प्राप्त केले. कार्यक्रम संचालन शेख मुजीब प्रस्ताविक हाशमी सय्यद फसीयोद्दीन यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परवीन नाजनीन, आयशा सिद्दीखा, समीना बेगम, रमीजा बेगम, आयशा शेख, नाजमीन परवीन, यास्मिन शेख यांनी पुढाकार घेतला.