मनपा प्रभाग समितीनिहाय सहायक कर अधीक्षकांच्या नियुक्त्या
एमडिओ संघटनेकडून आयुक्तांचे स्वागत
परभणी (प्रतिनिधी) महानगरपालिका आयुक्तांनी कार्यालयीन आदेश कार्यालयीन कामकाज वाटपाबाबत मंगळवारी (दि.१) परभणी शहर महानगरपालिकेच्या विविध विभागाचे प्रशासकीय कारणास्तव व कार्यालयीन कामाच्या सोयीसाठी विभागनिहाय विविध कामकाज वाटप करण्यात आले. महापालिका अस्तित्वात आल्यापासून सहाय्यक कर अधिक्षक पदभार एकच असल्याने तीन्ही प्रभाग समिती निहाय स्वतंत्र सहाय्यक कर अधिक्षक पदभार देण्यात यावे अशी मागणी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने महापालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. या निवेदनाची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिका प्रभाग समिती अबक निहाय मालमत्ताविभागाचे अतिरिक्त कर अधीक्षक देण्यात आले. महापालिका अस्तित्वात आल्यापासून प्रथमच तिन्ही प्रभाग समिती विभागांना सहाय्यक कर अधीक्षक देण्यात आले. त्यामुळे मालमत्ता धारकांना फेरफार, हस्तांतरण पत्र अडिअडचणी कामकाजात होणारा विलंब दूर होणार आहे. यासंबंधी आयुक्तांनी घेतलेला निर्णयाचे मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने सय्यद रफीक पेडगावकर, शेख उस्मान शेख इस्माईल यांनी स्वागत करतं समाधान व्यक्त केले आहे.