मराठवाडा

माजूलाला यांची विधानसभेची तयारी जोरात

परभणी ( प्रतिनिधी)
विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून या आठवड्यात निवडणूक आयोगातर्फे विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवार कामास लागले आहेत. परभणी विधानसभा निवडणुकीसाठी माजी महापौर सय्यद समी उर्फ माजू लाला यंदा विधानसभेची निवडणूक लढविणार असून त्यांनी या संबंधित तयारी सुद्धा सुरू केली आहे. त्यांच्या वतीने शहरातील 2000 पेक्षा अधिक ऑटो आत्तापासूनच निवडणुकीसाठी बुक करण्यात आले आहेत. सोबतच प्रत्येक बूथ स्तरावर कार्यकर्ते नियुक्त करण्यात येत आहेत. “वन बूथ हंड्रेड युथ”ही संकल्पना घेऊन बूथ बांधणी केली जात आहे. नेमक्या कोणत्या पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढविणार हे मात्र अद्याप माजूलाला यांनी उघड केले नाही, परंतु त्यांनी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. माजू लाला अल्पसंख्याक समाजातील एक प्रभावी नेते आहेत. विविध समाज उपयोगी कार्यक्रमात ते अग्रेसर असतात. नुकताच त्यांनी परभणीकरांसाठी त्यांचे बंधू स्वर्गीय सज्जू लाला वो हाफिज चाऊस यांच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय स्तराच्या मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोबतच ते कोरोना काळापासून शहरात सर्व समाजातील लोकांसाठी रोटी बँक चालवतात या ठिकाणी दररोज शेकडोच्या संख्येने नागरिक निशुल्क भोजनाचा आस्वाद घेतात. शहरातील रुग्णांच्या सेवेसाठी सजुलाला मित्र मंडळाच्या वतीने रुग्णवाहिका चालवण्यात येते. आतापर्यंत केलेल्या लोक कल्याण कार्य, कार्यकर्त्यांची मजबूत फडी, व अल्पसंख्याक समाजात असलेली प्रतिमा, व अन्य समाजातील कार्यकर्ते व मित्र परिवाराच्या साह्याने माजू लाला यंदा विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button