गावठी कट्याचा धाक दाखवुन अपहरण करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
अवघ्या २४ तासाचे आत अपहृत व्यक्तीची केली सुखरूप सुटका
आखाडा बाळापूर (प्रतिनिधी )
दिनांक ०३/१०/२०२४ रोजी रात्री ०७.३५ वाजता पो.स्टे. आ. बाळापुर हद्दीतील कांडली फाटयाच्या उड्डानपुलाखाली फिर्यादी काशीनाथ गणपतराव शिंदे यांचे वडील गणपतराव शिंदे, वय ६५ वर्ष, रा.आडा. ता. कळमनुरी, जि. हिंगोली यांचे अज्ञात आरोपींनी अपहरण केले होते व त्यांना सोडण्यासाठी फिर्यादीकडे १ कोटी रूपयांची मागणी केली होती.
हिंगोली पोलीसांना याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चन पाटील, श्री. विकास पाटील, पो.नि. स्था.गु.शा., यांनी आ. बाळापुर येथे धाव घेवुन फिर्यादीचे तक्रारीवरून पो.स्टे. आ.बाळापुर येथे अज्ञात आरोपींविरूध्द भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १३७ (२), १४० (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे यांनी या घटनेची सर्व सुत्र आपल्या हातात घेवुन वेगवेगळी ७ तपास पथके तयार केले होते. त्यानुसार सर्व पथकांनी जमा केलेल्या माहितीचे अचुक विश्लेषण व गोपनिय माहिती काढुन तसेच तांत्रीक अभ्यास करून गुन्हयातील पिंडीत व्यक्ती गणपतराव शिंदे यांची माहिती जमा केली. त्याप्रमाणे मिळालेल्या माहितीवरून आरोपी निष्पन्न करून सदर गुन्हयातील पिडीत व्यक्ती व अपहरण करणारे आरोपी यांना संभाजीनगर जिल्हयातील अब्दीमंडी
भागातुन स्थानिक पोलीसांच्या मदतीने शिताफीने ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे १) सुरजसिंग उर्फ सुरेंद्रसिंग जगतसिंग गाडीवाले, वय २४ वर्ष, रा. नंदिग्राम सोसायटी, नांदेड, २) राधेश्याम पंजाबराव भालेराव, वय २४ वर्ष, रा. महाराणा प्रताप चौक, नांदेड, ३) शेख तौसीफ शेख समीर, वय ३२ वर्ष, रा. बारी कॉलनी, संभाजीनगर, ४) मुदस्सर हुसेन एकबाल हुसेन, वय २४ वर्ष, रा. खलवट, चारमिनार, हैद्राबाद (तेलंगाणा स्टेट), ५) सईद शाकेर अली सईद नासेर अली, वय २८ वर्ष, कासम बारी, दर्गा बडेगाव, संभाजीनगर, ६) शेख नजीर शेख शफी, वय ३२ वर्ष, रा.आसेफीय कॉलनी, टाऊन हॉल, संभाजीनगर असुन त्यांच्यावर यापुर्वी खुन,
खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी असे शशिराविरुध्द व मालाविरुध्दचे अनेक गुन्हे दाखल असुन, आरोपी हे गंभीर स्वरूपाचे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. तसेच नांदेड व कर्नाटक (बिदर) मध्ये जबरी चोरी व खुनाचा प्रयत्न करून फरार असल्याचे सुध्दा निष्पन्न झाले आहे.
आरोपीकडुन गुन्हयात वापरलेली कार, गुन्हयात वापरलेले ०२ गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतुस, गुन्हयांत वापरलेले ०९ मोबाईल असा एकुण १५,००,०००/- रू (१५ लाखाचा) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.हिंगोली पोलीसांनी अपहरण झालेल्या वेळेपासुन २४ तासाच्या आत सदर गुन्हयातील आरोपी व पिडीत व्यक्ती यांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. श्री विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.श्री. शिवसांब घेवारे, सपोनि. श्री राजेश मलपिलु, पोउपनि. श्री विक्रम विठुबोने, पोउपनि.श्री कपील आगलावे, पोलीस अंमलदार राजु ठाकुर, नितीन गोरे, किशोर सावंत, दत्ता नागरे, आकाश टापरे, आझम प्यारेवाले, विशाल खंडागळे, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, इरफान पठाण, प्रदिप झुंगरे तसेच पो.स्टे. आ. बाळापुरचे पो. नि. श्री विष्णुकांत गुट्टे, सपोनि. श्री बसवंते व त्यांचे पोलीस अंमलदार तसेच गुन्हे शाखा संभाजीनगर चे पोलीस उपायुक्त श्री प्रशांत स्वामी, पो.नि. श्री गुरमे, सपोनि. श्री विनायक शेळके, छ. संभाजीनगर ग्रा. चे सपोनि. श्री मोटे व पथक यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. पुढील तपास पो.नि. श्री विष्णुकांत गुट्टे, पो. स्टे. आ. बाळापुर हे करीत आहेत.