डॉ.संजय रोडगे हे राजकारणापलीकडे जाऊन कार्य करणारे व्यक्तिमत्व – मा.आ.सौ.मेघनादिदी बोर्डीकर – साकोरे
सेलू (प्रतिनिधी)डॉ. संजयदादा रोडगे मित्र मंडळ आयोजित आई महोत्सव या ठिकाणी सेलू-जिंतूर मतदार संघातील लाडक्या आमदार माननीय सौ. मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांनी आज उपस्थिती दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्रमुख उपस्थिती सौ. मेघना दीदी बोर्डीकर-साकोरे, श्री. प्रकाश गजमल, श्री. संजय गटकळ, श्री. दत्तात्रय लाटे, विश्वनाथ गजमल, आबासाहेब तायडे, बद्री बरसाले, योगेश बरसाले, ज्ञानेश्वर बरसाले, राम घोडके, जगदीश घोडके, विश्वनाथ घोडके, विष्णू आठवले, हरिभाऊ बरसाले, राहुल गाडेकर, अर्जुन भुरे, रामचंद्र बरसाले, अनिल बरसाले, विठ्ठल फासाटे, बद्रीनाथ बरसाले, आबासाहेब वाघ, अजय वाघ, संजय वाघ, शाम वाघ, उद्धव खेडेकर, वसंत खेडेकर, पुंडलिक खेडेकर l, बाबासाहेब खेडेकर, जनार्दन वायकुंडे, कल्याणराव पुणेकर, शिंदे टाकळी येथील महिला सरपंच सौ . अश्विनी कैलास पवार, नाथा पवार, कैलास पवार, सागर पवार, आत्माराम पवार, बाळासाहेब बोंबले, अंकुशराव पवार, प्रकाश राठोड, बाबासाहेब पवार, महादेव गजमल, दिगंबर पवार, सुदामाती पवार व कार्तिक पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना सौ. मेघनादीदी बोर्डीकर-साकोरे यांनी सर्वप्रथम डॉ. संजयदादा रोडगे मित्र मंडळ आयोजित आई महोत्सव या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल डॉ. संजय रोडगे व मित्र परिवाराचे अभिनंदन केले.
दरवर्षी अगदी थाटामाटात डॉ.संजय रोडगे हा आई महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्यांची समाजाप्रती काम करण्याची नेहमीच तळमळ असते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध ग्रामीण भागातील महिलांना मंठा या ठिकाणी देवीचे दर्शन, त्यांच्या फराळाची व्यवस्था व शेवटी एक सदिच्छा भेटवस्तू साडी चोळी दिली जाते.
आज आपण पाहत आहोत समाजामध्ये असे उपक्रम राबविणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे, परंतु डॉ.संजय रोडगे हे दरवर्षी सदरील उपक्रम शासनाच्या कुठलेही अनुदान न घेता स्वखर्चाने चालवतात त्याबद्दल त्यांचे खरंच कौतुक केले पाहिजे.
याप्रसंगी समोर बोलताना त्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती महिला वर्गांना दिली. यामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना अंतर्गत सर्व महिलांना प्रति महिना 1500/- रुपये मिळत आहे व भविष्यामध्ये यामध्ये बदल होणार असून 1500/- रुपये प्रति महिना ऐवजी 3000/- रुपये प्रति महिना महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत देणार आहोत असे सांगितले.
त्याचबरोबर भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या विविध योजनांचा सविस्तर आलेख त्यांनी उपस्थित महिलांना सांगितला यामध्ये मागेल त्याला शेततळे, विहिरी, शेतकरी सन्मान योजना, एक रुपयांमध्ये विमा योजना, मागेल त्याला सोलार पंप अशा विविध योजनांचा आढावा त्यांनी उपस्थित महिलांसमोर सादर केला.
सर्वसामान्य कुटुंबातील मुलींनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे याकरिता भाजप सरकारने उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलींना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी नमूद केले. लाडका भाऊ योजनेअंतर्गत गावोगावी बेरोजगार असलेल्या तरुण वर्गांना या योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
भाजप सरकारने केलेल्या या सर्व कामाची पावती म्हणून येणाऱ्या काळामध्ये देखील भाजप सरकारच सत्तेमध्ये येईल असा विश्वास याठिकाणी त्यांनी व्यक्त केला. येणाऱ्या आगामी निवडणुका जसे की विधानसभा, जिल्हा परिषद यामध्ये तुम्ही देखील आमच्या पाठीमागे मोठ्या ताकतीने उभे राहाल अशी इच्छा व्यक्त केली.