परभणी(प्रतिनिधी)
सेलू येथील गाजलेल्या करवा खून प्रकरणातील चार प्रमुख आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठरवण्यात आली आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल प्रथम जिल्हा न्यायाधीश श्रीमती नायर यांनी आज शुक्रवार 18 ऑक्टोंबर रोजी दिला आहे.
कलम 120 ब आणि कलम 302 भादवीनुसार न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. शिक्षा ठोकण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल कासट, विनोद अंभोरे, विशाल पाटोळे, राजाभाऊ खंडागळे यांचा समावेश आहे. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील डी. यू.दराडे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली.