परभणी (प्रतिनिधी) परभणी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “एमडीओ”फॉर्मुला अवलंबिला जात आहे. माजूलाला यांना उमेदवारी देऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुस्लिम दलित सोबतच मराठा आरक्षणा च्या आंदोलनानंतर एकत्र आलेल्या ओबीसी समाजाची मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. यात मोठ्या प्रमाणात उपाशी समाज बांधव वंचित बहुजन आघाडी पक्षाशी जुळत असल्याचे चित्र परभणी विधान सभा मतदार संघात पहावयास मिळत आहे. हीच परिस्थिती अन्य तिन्ही मतदारसंघात आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी परभणी विधानसभा मतदारसंघात माजी उपमहापौर सय्यद समी उर्फ माजूलाला यांना उमेदवारी दिली. उमेदवारी घोषित होतात त्यांनी प्रचाराला सुरुवात सुद्धा केली आहे. माजूलाला हे ललित व मुस्लिम समाजाची एक गठ्ठा ग घेतील व ओबीसी समाजाची सुद्धा मते वंचित ला मिळतील अशी अपेक्षा वंचितच्या वतीने केली जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सय्यद समी उर्फ माजुलाला यांना ओबीसी समाजाचा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मंगळवारी एका खाजगी हॉटेलमध्ये ओबीसी समाजाच्या काही नेत्यांनी मेळावा घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारास पाठिंबा दिला आहे. त्यामुळे वंचितच्या वतीने दलित मुस्लिम व ओबीसी म्हणजेच “डी एम ओ पॅटर्न” सध्या तरी यशस्वी असल्याचे चित्र परभणीत पहावयास मिळत आहे
Related Articles
Check Also
Close
-
चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चार आरोपला सेलू पोलिसांनी घेतले ताब्यातSeptember 23, 2024