पूर्णा रेल्वे स्थानकावर ऐन दिवाळीच्या वेळी गाड्याची प्लॅटफॉर्मवर अफरातफर
प्रवासी व वृद्धची धावपळ, मेन लाईन वरील गाड्या वळविण्याचा गोरख धंदा कोणाच्या इशाऱ्यावर
पूर्णा रेल्वे स्थानकावर ऐन दिवाळीच्या वेळी गाड्याची प्लॅटफॉर्मवर अफरातफर
प्रवासी व वृद्धची धावपळ,
मेन लाईन वरील गाड्या वळविण्याचा गोरख धंदा कोणाच्या इशाऱ्यावर
पूर्णा (प्रतिनिधी)पूर्णा रेल्वेस्थानकावर मेन लाईनचे गाड्या लूप लाईन वर वळविण्यात येत आहे त्या मूळे रेल्वेच्या नांदेड मंडळाचे परभणी साठी वेगळे नियम आणि पूर्णा साठी वेगळे नियम कसे का असा प्रश्न प्रवाशी वर्गा मध्ये निर्माण झाला आहे ऐन दिवाळी सणा उंबरठ्यावर पूर्णा रेल्वे स्थानकावर गाड्याचे फ्लाटफार्म बदलण्याची अफरातफर सुरू असून सदर अफरातफर कँटीग चालकाच्या फायद्यासाठी आणि कोणाच्या इशारा वर चालत आहे याबाबत नांदेड मंडळाच्या विरोधात उलट सुलट चर्चा होत आहे.
पूर्णा रेल्वे स्थानकवर ये जा करणाऱ्या गाड्याचे ऐन वेळी फ्लाटफार्म बदलण्याचा बाबतीत नेहमीत चर्चेत राहिला आहे आता पुन्हा ऐन दिवाळीच्या उंबरठ्यावर पूर्णा रेल्वे स्थानकावर ये जा करणाऱ्या गाड्याची अचानकपणे मेन लाईन वर येणाऱ्या गाड्या लूप लाईन वर घेण्यात येत आहे या मुळे प्रवासीयाना फ्लाटफार्म बदलण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत लहान मुले,वृद्ध महिला पुरुषांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे विशेष बाब म्हणजे अवघ्या पूर्णा रेल्वे स्थानकावर वरून तीस कि मी च्या अंतरावर असलेल्या परभणी रेल्वे स्थानकावर प्रवासीच्या सोय आणि वेळेची बचत करण्यासाठी ये जा करणाऱ्या गाड्याना मेन लाईन वर घेण्यात आहे आणि पूर्णेत मात्र कॅन्टीग चालकाच्या फायद्या साठी मेन लाईनचे गाड्या लूप लाईन वळविण्याचा गोरख धंदा सुरू आहे त्या मुळे नांदेड रेल्वे मंडळाचे परभणी साठी वेगळे नियम आणि पूर्णा रेल्वे स्थानका साठी वेगळे नियम आहे का?असा प्रश्न प्रवासीयाना पडत आहे संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून कँटीग चालक गाड्याची अफरातफर करत असल्याची चर्चा होत आहे इतकेच नव्हे पूर्णा रेल्वे स्थानकावरील मेन लाईन वर अचानक गाड्या येण्याचा अगोदर मालगाडी घेऊन ती तासो न तास उभे करून मेन लाईन ब्लॉक करून मेन लाईनचे गाड्या लूप लाईन वर घेत आहे त्यामुळे पूर्णा रेल्वे स्थानकावरील मेन लाईन वरील गाड्या इकडे तिकडे वळविण्याचा गोरखधंदा कोणाच्या इशारा वर आणि कोणाच्या दबावाखाली चालत आहे या बाबत उलट सुलट चर्चा प्रवासी वर्गातून होत असून नांदेड कंट्रोल आणि पूर्णा रेल्वे स्थानकावरील संबंधित स्टेशन मास्तर मनीष शर्मा आणि अग्रवाल याच्या काळातच जास्त करून गाड्याची अफरातफर होताना दिसत आहे त्यामुळे सदर स्टेशन मास्तर कोणाच्या इशाऱ्या वर गाड्या अफरातफर करण्याचा प्रताप करत आहे याची उच्च चौकशी करून संबंधिता वर नांदेड मंडळाचे व्यवस्थापकानी कारवाई करून पूर्णा रेल्वे स्थानकावर सुरू असलेले गाड्याचे प्लांटफार्म बदलण्याचा गोरखधंदा थांबवा अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे