स्नेह मेळाव्यानिमित्त वीस वर्षानंतर आले मित्र..एकत्र..
हिंगोली शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद विद्यालय डिग्रस (क) येथे 20 वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांनी “स्नेहमेळावा”आयोजित केला होता.
या प्रसंगी कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री शामराव जगताप, श्री ज्ञानबाराव कऱ्हाळे, पर्यवेक्षक श्री प्रताप पाटील सर,माजी मु:अ:श्री धंदरे साहेब, माजी सहकारी आदर्श शिक्षक श्री गोविंदराव कऱ्हाळे सर, श्री शामराव कावरे सर,श्री सावके सर,श्री साहेबराव शिंदे सर,श्री माधवराव गव्हाणे सर, श्री साळवे सर, श्री अंकुशराव शिंदे सर, श्री सुरेश पुरी सर,श्री कांताराव वास्टर,श्री वाळके , श्री माणिक हिंगोली (प्रतिनिधी)
यांचा माजी विद्यार्थ्यांनी सत्कार केला.
जवळपास 60 माजी विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते,सर्वांनी आपल्या जीवनातील आठवणींना उजाळा दिला.सर्वांना एक अनोखा आगळावेगळा हा कार्यक्रम पाहून सर्वच शिक्षक व विद्यार्थी भारावून गेले.
माजी विद्यार्थी श्री अमोल दिलीपराव भिसे रा.दाटेगाव ह.मु.मुंबई यांनी शाळेच्या विकासासाठी 25000रुपये शाळेला देणगी दिली.माजी विद्यार्थ्यांनी खुप मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला, कार्यक्रमासाठी आलेल्या विद्यार्थ्यीनींना साडी,चोळी देवून कार्यक्रमाची सांगता झाली
सर्वांनी खिचडी,भजे,कढी,खवा जिलेबी या मिष्टान्न जेवणाचा लाभ घेतला व एक आनंददायी पर्वाची संध्याकाळी 6:30 वाजता सर्वजण आपापल्या घरी परत गेले.