परभणी चा उर्स फक्त दहा दिवस राहणार
रात्री दहा वाजता उरसातील दुकाने बंद होणार, जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश

परभणी (प्रतिनिधी)
दर्गा हजरत सय्यद शहा तुरा बुल हक रहे. यांचा उर्स आता दहा दिवसाचा राहणार आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यासंबंधी आदेश काढले आहेत. सोबतच आता उर्स रात्री फक्त दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या दर्गा हजरत सय्यद शहा तुराबुल हक साहेब यांचा उर्स दरवर्षी 31 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत भरतो हा उर्स रात्री उशिरापर्यंत सुरू राहतो, यात लाखोच्या संख्येने भाविक सहभागी होतात. मागील काही दिवसापासून अनेक संघटना व राजकीय पक्षांनी उर्स चा कालावधी कमी करावा व उर्स चा वेळ रात्री दहा वाजेपर्यंत करण्यात यावा अशी मागणी लावून धरली होती. सोबतच मागील वर्षी उर्स च्या काळामध्ये कायदा व संस्थेच्या अडचणीत निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी एक पत्र काढून उर्स चा कालावधी 2 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत करण्याचे जाहीर केले आहे. सोबतच रात्री दहा वाजता उर्स मधील सर्व दुकाने, करमणुकीची साधने बंद करण्याचे निर्देश या पत्रात देण्यात आले आहे. या पत्राची प्रत पोलीस अधीक्षक व जिल्हा वक्फ अधिकारी यांना 22 जानेवारी रोजी रोजी देण्यात आली आहे. त्यात सर्व निविदा र्धारकांना याबाबत आदेशित करून सदरील आदेशाचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.