राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांच्या शाळेच्या मैदानात अजित दादांचा कार्यक्रम

परभणी (प्रतिनिधी) येत्या 28 फेब्रुवारी रोजी परभणीत महात्मा फुले शाळेच्या मैदानावर अजित दादा पवार यांचा कार्यक्रम होत आहे ही शाळा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विजय गव्हाणे यांची आहे. त्यामुळे सदरील कार्यक्रमाविषयी चांगली चर्चा होत आहे.
परभणीत 28 फेब्रुवारी राष्ट्रवादी अजित पवार गटात अक्षय देशमुख यांच्या नेतृत्वात 18 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. हा कार्यक्रम परभणी येथील जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले शाळेत आयोजित करण्यात आला आहे. या शाळेचे पदाधिकारी किंवा सर्वेसर्वा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विजय गव्हाणे यांच्या संस्थेची आहे. एकीकडे राज्यभर शरदचंद्र पवार व अजित पवार गटात राजकीय रस्सीखेच सुरू असताना परभणीत मात्र वेगळे चित्र पहावयास मिळाले. शरद शरद चंद्र पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांच्या शाळेच्या मैदानात ही सभा होत असल्याने वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.