नवी दिल्ली, गेल्या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत झालेले वक्फ सुधारणा विधेयक कायद्यात रुपांतरीत झाले असून आजपासून संपूर्ण देशभरात ते लागू झाल्याचे केंद्र सरकारकडून लागू करण्यात आले आहे.सर्वोच्च न्यायालयात १५ हून अधिक वक्फ विधेयकाविरोधात आव्हान याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यावर १६ एप्रिलला सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच केंद्र सरकारने हा कायदा लागू केला आहे. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने वक्फ कायदा लागू केल्याची अधिसूचना जारी केली आहे. या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी होण्यापूर्वी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. यामध्ये आमची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश दिला जाऊ नये असे केंद्र सरकारने म्हटले आहे. वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ (२०२५ चा १४) च्या उपकलम (२) च्या कलम १ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून ८ एप्रिल २०२५ ही तारीख कायद्याच्या तरतुदी अंमलात येण्याची तारीख म्हणून निवडत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.लोकसभा आणि राज्यसभेत मध्यरात्री नंतर वक्फ सुधारणा विधेयकावर मतदान घेण्यात आले होते. ३ एप्रिलला लोकसभा आणि ४ एप्रिलला राज्यसभेत हे विधेयक पास करण्यात आले होते. यानंतर लगेचच ५ एप्रिलला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावर सही केली होती. हे विधेयक संमत होताच काही मुस्लिम खासदारांसह विविध संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केल्या होत्या. यावर लवकरच सुनावणी होणार आहे. काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद आणि एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यानी याचिका दाखल करून दावा केला आहे की हे विधेयक धार्मिक स्वायत्ततेला कमी लेखते आणि वक्फ मालमत्तेवर मनमानी निर्बंध लादते. आम आदमी पक्षाचे (आप) आमदार अमानतुल्ला खान आणि द्रमुक यांनीही वक्फ (सुधारणा) विधेयक २०२५ ला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
प. बंगालमध्ये हिंसक निदर्शन, पोलिसांची वाहने पेटविली वक्फ दुरुस्ती कायदा विधेयकावरुन पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातीलरघुनाथगंज पोलीस ठाणे हद्दीत उमरपुर बानीपुर परिसरात आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या वेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १२ वर चक्का जाम केला आहे. यावेळी जमावाने पोलिसांच्या दोन वाहनांना आग लावली आहे. यामुळे या परिसरात तणाव पसरला असून पोलिसांनी लाठीमार केला आहे.वक्फ कायद्याचा विरोध करण्यासाठी निर्देशने सुरु होती. हा कायदा सरकारने मागे घ्यावा अशी मागणी निदर्शक करीत होते. जेव्हा पोलिसांना हा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा निदर्शकांनी संतापाने पोलिसांच्या अंगावर विटांचा मारा केला. तसेत रस्त्यांवर चक्का जाम केला. त्यानंतर निदर्शकांना रस्त्यांवरील पोलिसांच्या दोन वाहनांना पेटवले, ज्यामुळे याक्षेत्रात दहशतीचे वातावरण पसरले आहे. मुर्शीदाबाद येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. १२ अजूनही बंद आहे. निदर्शकांना आवरण्यासाठी अतिरिक्त फोजफाटा घटनास्थळी रवाना करण्यात आला आहे. परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतू निदर्शने करणाऱ्यांचा राग शांत