देश

परभणीच्या ए.आर. स्टड फार्मच्या अश्वांनी देशभरात केले परभणीचे नावलौकिक

देशभरातील विविध स्पर्धेत पटकावले 50 पेक्षा अधिक मानाचे चषक

परभणी (प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध अश्वप्रेमी अब्दुल रज्जाक शेख अबुबकर यांच्या ए.आर. स्टड फार्मने देशभरात आपल्या उत्कृष्ट अश्वांच्या बळावर परभणी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. लहानपणापासूनच्या अश्वपालनाच्या आवडीतून आणि सातत्यपुर्ण मेहनतीतुन,तन मन धन लाऊन त्यांनी हे यश संपादन केले आहे. आज देशाच्या कानाकोपऱ्यात ए.आर. स्टड फार्मची ख्याती पसरली आहे.

हिंद केसरीचा मान ‘अलसकब’ने पटकावला

गुजरात येथील कच्छ भुजमधील वैकरीया रण येथे नुकत्याच संपन्न झालेल्या प्रतिष्ठित ‘हिंद केसरी’ अश्व दौड स्पर्धेत ए.आर. स्टड फार्मच्या ‘अलसकब’ या देखण्या अश्वाने प्रथम क्रमांक पटकावून इतिहास रचला आहे.

इतर स्पर्धांमध्येही दमदार कामगिरी

गुजरात राज्यातील कच्छ भुज येथील व्हाईट रण मैदानात झालेल्या स्पर्धेत ए.आर. स्टड फार्मच्या ‘मलंग’ या अश्वाने सुद्धा प्रथम क्रमांक मिळवला.
उत्तर प्रदेशातील रौहनाई अयोध्या (फैजाबाद) येथे झालेल्या अश्व दौड स्पर्धेत ‘अझलान’ या अश्वाने द्वितीय, तर ‘अलसकब’ ने तृतीय क्रमांक पटकावला.
हरियाणातील भिवानी येथे रेवाल चाल व टाइमिंग प्रकारात ‘अलसकब’ ने प्रथम, तर ‘अझलान’ ने तृतीय स्थान प्राप्त केले.
महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या रेवाल चाल स्पर्धेत ए.आर. स्टड फार्मच्या ‘अझलान’ने अव्वल क्रमांक पटकावला.
शेलगाव (ता. सोनपेठ) येथे झालेल्या स्पर्धेत ‘अलसकब’ प्रथम, तर याच फार्मचा ‘झावीयान’ द्वितीय क्रमांकावर राहिला.
औरंगाबाद येथील प्रसिद्ध हरिसिद्धी माता यात्रा महोत्सवातील स्पर्धेत ए.आर. स्टड फार्मच्या अश्वांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. ‘अलसकब’ ने प्रथम, ‘अशकार’ ने द्वितीय आणि ‘अझलान’ ने तृतीय क्रमांक पटकावला. टाइमिंग प्रकारातही ‘अलसकब’ प्रथम, ‘अझलान’ द्वितीय आणि ‘अशकार’ तृतीय स्थानी राहिले.तसेच गॅलोप प्रकारात ‘अशकार’ या अश्वाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
नंदुरबारमधील सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलमध्ये ए.आर. स्टड फार्मच्या ‘अलसकब’ने प्रथम क्रमांक मिळवत ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब आपल्या नावे केला, तर ‘अशकार’ तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
ए.आर. स्टड फार्म, परभणीने आतापर्यंत देशभरात तब्बल 50 पेक्षा अधिक मानाचे चषक आणि तीन मोटारसायकल पारितोषिके जिंकून परभणी जिल्ह्याचे नाव गौरवान्वित केले आहे.
ए.आर. स्टड फार्मचे सर्वेसर्वा अब्दुल रज्जाक शेख अबुबकर हे परभणीतील प्रसिद्ध उद्योजक सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे शेख अबुबकर भाईजान यांचे धाकटे चिरंजीव आणि सय्यद अब्दुल खादर भाई यांचे भाचे आहेत.
या यशात ए.आर. स्टड फार्मचे अश्व सवार आफताब खान उर्फ गोलू भाई (उत्तर प्रदेश), आजम खान (उत्तर प्रदेश) आणि प्रदीप शिंदे उर्फ गोट्या (पुणे) यांच्यासह फार्ममधील सर्व सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button