“एमआरजीएस” च्या कामासाठी पैसे मागितल्यास थेट कारवाई
पाथरी भ्रष्टाचाराचा व मानवत येथील पंचायत समिती आढावा बैठकीत शेतकऱ्याच्या प्रचंड तक्रारी

पाथरी (प्रतिनिधी) पाथरी व मानवत येथील एमआरजीएस कामासाठी तांत्रिक सहायक ते गटविकास अधिकारी असे सर्वच जण सर्रासपणे पैसे मागत असतात. अशा तक्रारी पंचायत समिती आढावा बैठकीत मोठ्या प्रमाणातसमोर आल्या नंतर आमदार राजेश विटेकर यांनी दोषी अधिकारी व कर्मचारी यांची सर्वांसमोर कानउघाडणी केली. व यापुढे शेतकऱ्यांना त्रास झालाच तर थेट कारवाई करण्यात येईल अशी तंबी दिली. पाथरी व मानवत येथील पंचायत समिती आढावा बैठका घेण्यात आल्या शासकीय आढावा बैठक असतानाही मोठ्या प्रमाणावर शेतकरी आलेले होते, सिंचन विहिरी, रस्ते, गाय गोठे, पांदन रस्ते, वृक्ष लागवड अशा विविध कामासाठी पंचायत समिती मधील तांत्रिक सहायक हे प्रत्येक कामासाठी पैसे मागतात तर त्यांची तक्रार केल्यास गटविकास अधिकारी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार करतात, ज्यांनी पैसे दिले त्यांची कामे होतात आणि ज्यांनी पैसे दिले नाहीत अशा शेतकऱ्याची बिले रोखण्यात येतात असे म्हणत शेतकरी त्या कर्मचारी व अधिकारी यांच्या वर तुटून पडले , आ राजेश विटेकर यांना शेतकऱ्याची होत असलेली लुटमार लक्षात आल्याने त्यांनी सर्व एमआरजीएस चे तांत्रिक सहायक यांना एका ओळीत उभे करून त्यांनाच शेतकऱ्याच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला लावली , शेतकऱ्याचा रोष लक्षात आल्याने यापुढे शेतकऱ्याची तक्रार येऊ देणार नाहीत आणि अडवणूक करणार नाही अशी कर्मचाऱ्यांनी सर्वांसमोर कबुली दिली, त्यावेळी आ राजेश विटेकर यांनी पहिली बैठक असल्याने तुम्हाला सुधारण्याची संधी देतो यापुढे अशा तक्रारी आल्यास मी थेट मंत्र्याकडे किंवा सचिवांकडे तक्रार करून घरी बसवेल किंवा शेतकऱ्यांना थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडे तक्रारी करून मालमत्तेची चौकशी करावयास लावेल अशी तंबी दिली त्यावेळी सर्व शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले, पाणीपुरवठा विभागाच्या बहुतांशी योजना अर्धवट राहिल्या आहेत किंवा बोगस कामे करून पूर्ण झाल्याचे दाखवून त्यांचे हस्तांतरण करून त्या ग्रामपंचायतीच्या माथी मारण्याचे प्रकार गुतेदार व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी करत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर या बैठकीत झाल्या , नागरिकांनी आपापल्या तक्रारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे लेखी स्वरुपात कराव्यात व त्याची प्रत माझ्या कडे द्यावी लवकरच त्या योजनाच्या तक्रारी बाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत बैठक लावण्यात येईल असे आमदार विटेकर यांनी सर्व नागरिकांना सांगितले, तसेच बियाणे व खतांची टंचाई होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पूर्वीच त्याची खरेदी करून ठेवावी तसेच एकाच वाणासाठी मागणी करू नये सध्या बाजारात जे उपलब्ध आहेत ते खरेदी करून पूर्वतयारी करून ठेवावे , असे आवाहन आ विटेकर यांनी शेतकऱ्यांना केले तर बियाणे व खते बाबत लवकरच भरारी पथकाची स्थापना करण्यात येणार असून काळया बाजारास प्रतिबंध करण्यात यावा अशा सूचना आमदार विटेकर यांनी उपस्थित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या , घरकुल योजना साठी अनुदान वाटप करण्यात येत असून त्या त्या त्या टप्या प्रमाणे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत, ज्यांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही त्यांनी बांधकामाच्या सद्यस्थितीचे फोटो जोडून गटविकास अधिकारी यांना भेटून मागणी करावी काही अडचण आली तर मी त्याची सोडवणूक करणार असल्याचे आमदार विटेकर यांनी सांगितले या विषयासोबतच इतर विभागांचा आढावा घेण्यात आला, *यापुढे शेतकरी व नागरिकांच्या तक्रारीची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दर तीन महिन्यांनी तालुका स्तरीय विभागप्रमुखाच्या बैठका घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस पाथरी व मानवत तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, अधिकारी , कर्मचारी, शेतकरी , नागरिक मोठ्या संख्येने होते.