सोनपेठ (प्रतिनिधी)शहरातील एका पेट्रोल पंपावर रात्रीच्या सुमारास बिबट्याची एक मादी बछड्यासह आढळुन आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सोनपेठ शहराच्या सुरवातीलाच असलेल्या व्यंकटेश्वरा फिलींग सेंटर वर रात्रपाळीत काम करणाऱ्या शिवप्रसाद लोंढे यांना गुरुवार 22 रोजी रात्री कुत्र्यांच्या ओरडण्याचा व कुत्रे पंपावरुन पळून गेल्याचे आढळून आल्याने त्यानी सकाळी सिसीटीव्ही चे फुटेज तपासले असता त्यांना सिसीटिव्हीत रात्री दिड वाजे च्या सुमारास बिबट्याच्या सदृश प्राणी आपल्या पिल्यासह वावरतांना आढळुन आला तर त्याने कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न केल्याने कुत्रा पळुन गेल्याचे दिसले. या बाबत त्यांनी पंपाचे मालक सुमीत पवार यांना या बाबत कळवले. त्यांनी या बाबत स्थानिक पोलीस व वन विभागाला माहिती दिली. सोनपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुर्यमोहन बोलमवाड, वनरक्षक सुरेखा टोम्पे यांनी पेट्रोल पंप व आजुबाजूच्या परीसराची
डॉ. योनिनी तम्मेवार (कोंडावार) स्वीरोग प्रसूतीत
पाहणी केली. सीसीटीव्हीत बिबट्याच्या सदृश प्राणी आपल्या बछड्यासह दिसुन कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न करतांना दिसला तर गवळी पिंपरी शिवारात त्यांच्या पायचे ठसे आढळुन आले आहेत. या बाबत पोलीस निरीक्षक सुर्यमोहन बोलमवाड यांनी नागरीकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. तर सुरेखा टोंम्पे यांनी या प्राण्याला पकडण्यासाठी कॅमेरा ट्रॅप व इतर आवश्यक ती कारवाई वनविभागा मार्फत वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याचे सांगितले. या वेळी परमेश्वर कदम सुधीर बिंदु प्रा. वसंत सातपुते बाबासाहेब गर्जे, नामदेव जाधव यांच्या सह नागरिक उपस्थित होते.