मराठवाडा
भाजपच्या परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सुरेश भुमरे
भुमरे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे निकटवर्तीय

परभणी(प्रतिनिधी)
भारतीय जनता पक्षाच्या परभणी ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी सुरेश भुमरे यांची आज शनिवारी निवड जाहीर करण्यात आली.पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांचे कट्टर समर्थक म्हणून सुरेश भुमरे यांची ओळख आहे. युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून यापूर्वी त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. शहर जिल्हाध्यक्षपदी शिवाजी भरोसे यांची निवड जाहीर झाल्यानंतर लगेचच ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची निवड जाहीर होईल, असे अपेक्षित होते. या पदाबाबत अनेक नावांची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसेच वरिष्ठ नेत्यांना सर्व इच्छुक जाऊन भेटूनही आले होते. अखेर या सर्व इच्छुकांमध्ये भुमरे यांनी बाजी मारल