
बकरी ईद ईदच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांनी परभणी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 77 जणांना हद्दपार केले आहे. मागील कांहि वर्षातील बकरी ईद व गोवंश तस्करी व कतली संबंधाने परभणी जिल्ह्यातील दाखल गुन्ह्यातील आरोपीतांकडून बेकायदेशीर कृत्य घडले आहे व त्यांचे वर्तनामध्ये काहि एक सुधारणा झालेली नाही. त्यांचेकडून आगामी काळात सन उत्सव दरम्यान पुन्हा अशाच प्रकारचे गैरकायदेशीर कृत्य होवुन, एखादा गंभीर गुन्हा घडुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अशा आरोपींची माहिती घेऊन संबंधीतांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे बाबत पोलीस अधीक्षक परभणी श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी आदेश दिले होते.त्यावरून अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे यांचे नेतृत्वात परभणी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये बकरी ईद संबंधाने दाखल गुन्ह्यातील आरोपीतांविरूध्द परभणी जिल्ह्यातील एकूण 77 आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता चे कलम १६३ अन्वये त्या-त्या क्षेत्रातून दिनांक 06/06/2025 ते 08/06/2025 पावेतो हद्दपार करण्यात आले आहे.बकरी ईद चे पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व जिल्ह्याचे बॉर्डरवर 24 तास चेकनाके कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर नाकाबंदी करण्यात येत आहे. प्रत्येक नाकाबंदीचे ठिकाणी जनावरांच्या अवैध वाहतूकी संदर्भाने देखील वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
तसेच सोशल मिडीयावर देखील लक्ष ठेवण्यात येत आहे. कुणीही कुठल्याही समाज माध्यमांवर धार्मीक तेढ निर्माण होईल असे मजकूर, चित्र किंवा व्हिडीओ प्रसारीत करू नये. असे पोलीस प्रशासनाकडून अव्हान करण्यात येत आहे.