
परभणी(प्रतिनिधी) सोनपेठ तालुक्यातील दहीखेड या शिवारात संपत्तीच्या वादातून महावीर रामराव सोट या 38 वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आला.
सोनपेठ पोलिस ठाण्यात विनोद हाके नामक व्यक्तीने तक्रार दाखल केली. त्याद्वारे मावस भावामध्ये आजोबांकडून मिळालेला वाडा व इतर संपत्तीच्या कारणातून वाद सुरु होता. 10 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास या वादा संदर्भात महावीर सोट यांच्या घरी चर्चेकरीता बैठक बोलावण्यात आली. त्यात सामांजस्यपूर्वक तोडगाही निघाला. परंतु, वाद मिटल्याचा बहाणा करीत समाधान बर्वे, दत्ता बर्वे यांनी महावीर यांना शेतावर नेले व त्या ठिकाणी धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर, तोंडावर, छातीवर आणि पोटावर वार केले. त्यात ते मृत्यू पावले, असे नमूद केले.
दरम्यान, सोनपेठ पोलिसांनी या प्रकरणी समाधान सूर्यकांत बर्वे, दत्ता गंगाधर बर्वे, सूर्यकांत बापूराव बर्वे, पार्वतीबाई सूर्यकांत बर्वे, इंदुमती गणपत बर्वे, शुभम गणपत बर्वे, राजाराम अनंता बर्वे, ईश्वर अनंत बर्वे यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.