
परभणी प्रतिनिधी) परभणी शहरातील पाथरी रोडवरील भाजी मार्केट समोर ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. ही घटना मंगळवार 17 जून रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली.अनंता अच्युतराव कुलकर्णी (वय ६२) रा.ठाकरे नगर असे मयताचे नाव आहे. घटनेची माहिती मिळतात नांदेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कदम हे अधिकारी व कर्मचाऱ्यासह दाखल झाले. व घटनेचा पंचनामा करून उत्तरे तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. व तेथील वाहतूक सुरळीत केली.