मानवत पोलिसांची गावठी दारू अड्ड्यावर धाड
50 लिटर गावठी दारू जागीच केली नष्ट
मानवत (प्रतिनिधी)
मानवत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांच्यासोबत रामपुरी बिटचे इनचार्ज भारत नलावडे, महिला पो.शि.शकुंतला चांदेवाले, पो.शि.विजत लबडे , महेश रनेर यांनी मानवत ठाणे हद्दीतील भागात विशेष मोहीम राबविली. एका कारवाईत 50 लिटर गावठी दारू जागीच नष्ट करण्यात आली.
हातभट्टी , गावठी दारू रसायन मोठ्या तयार करण्यात येणार्या ठिकाणांची गोपनियतेने माहिती काढून पारधी वस्ती मंगरूळ बु. कॅम्प रामपुरी ते पाथरी हायवे रोडच्या बाजुला हातभट्टी तयार करत असताना रेड टाकण्यात आली. तसेच स्वतः स.पो.नि.संदिप बोरकर यांनी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य स्टीलटाकी, हातभट्टी रसायन हे जमिनीवर सांडुन साहित्य नष्ट केले. जवळपास 50 लिटर गावठी दारू जागीच नष्ट करण्यात आली. आरोपीविरोधात मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास बिटचे इनचार्ज भारत नलावडे हे करत आहेत.