साखळी उपोषणासाठी पक्कै स्टेज बांधकाम करण्यासाठी परवानगी द्या-सकल मुस्लिम समाजाची मागणी
परभणी (प्रतिनिधी)
मुस्लीम समाजाचा आरक्षण मिळण्यासाठी व विविध मागण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण व आंदोलन सुरु केले असून मागील 26 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. त्यास शासनाचा प्रतिसाद न मिळत असल्यामुळे उपोषण ग्राऊंड येथे तात्पुर्त्या स्वरुपात बांधकाम करुन स्टेज बांधण्यास परवानगी मिळण्याची मागणी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना करण्यात आली आहे. मुस्लीम अल्पसंख्याक समाजास शिक्षण व नौकऱ्यामध्ये सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या दिशा निर्देशाप्रमाणे व न्याय मंयांना केलेल्या शिफारसीनुसार मुस्लीम समाजास आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी एक ऑगस्ट रोजी पासुन बेमुदत आंदोलन व साखळी उपोषणास सुरुवात केलेली आहे, परंतु आज पर्यंत 26 दिवसाचा कालावधी लोटलेला असतांना सुध्दा मा. जिल्हाधिकारी, तहसिलदार साहेब किंवा इतर शासकीय कार्यालयामार्फत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही, त्यामुळे सदरचे उपोषण हे किती दिवस, महिने किंवा वर्षे चालेल याची शाश्वती देता येत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसाचा त्रास होत आहे व पुढे हिवाळा सुरु होणार आहे त्यात थंडीचा त्रास तसेच तेथे लावण्यात आलेले टेन्टचा भाडा हा खुप जात असल्याने व तेवढी आर्थिक तरतुद होत नसलयाने सदर ठिकाणी सकल मुस्लीम समाजाच्या साखळी उपोषणास बसण्यासाठी तात्पुर्त्या स्वरुपात बांधकाम करुन स्टेज बांधण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी चक्क सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.