नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. भर रस्त्यात धारदार शस्त्रानं वार करून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.चार ते पाच जणांनी तरुणावर हल्ला केला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शताब्दी चौकात ही खळबळजनक घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. पवन सोटक्के असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पवन सोनटक्के हा तरुण अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शताब्दी चौकात उभा होता, चौकात उभा असताना त्याचा तेथील काही तरुणांशी वाद झाला. या वादातून चार ते पाच जणांनी त्याच्यावर धारदार शस्त्रानं वार केला. या हल्ल्यात पवन गंभीर जखमी झाला होता. जखमी झालेल्या पवनचा घटानस्थळीच मृत्यू झाला.
भर रस्त्यात तरुणाची हत्या करण्यात आली आहे, या घटनेमुळे परिसरात दहशतीच वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती दिली. या घटनेनं नागपुरात खळबळ उडाली आहे.