रामगिरी महाराज यांच्यावर शासन कडक कारवाई करत नसल्याने मुस्लिम समाज संतप्त
तब्बल अर्धा तास अडविला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा
परभणी (प्रतिनिधी)
रामगिरी महाराजावर अनेक ठिकाणी गून्हे दाखल होवून ही पोलीस काहीच कारवाई करत नसल्यामूळे परभणी जिल्हायातील संतप्त मूसलीम समाज बांधवानी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा आडवीला गिरी महाराज यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
वसमत येथे कार्यक्रमा साठी दाखल होत असताना वसमत शहराच्या बाहेर परभणी रस्त्यावर बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास परभणी येथील मुस्लिम समाज बांधवांनी वसमत येथे पोहोचून उपमूख्यमंञी अजित पवार यांचा ताफा अडविला. याप्रसंगी अजित पवार यांच्याशी बोलताना शासनाने मूस्लीम समाजाच्या भावनेचा अंत पाहू नये,हा समाज मोहम्मद पैगंबर बदल व पविञ ग्रंथ कूराण बदल कसल्याही प्रकारचे अपशब्ध सहन करु शकत नाही .तसेच पैगंबर व इतर कोणत्याही महापूराषां बदल अवमान करणार्या करणार्या व्यकती वर यूपीए सारखा कायदा सरकार ने बनवावा अशा प्रकारचे निवेदन अजित पवार यांना देण्यात आले.
परभणी येथील सामाजीक कार्यकर्ते सय्यद खादर यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी , जिल्हायातील शेकडो तरूण मूस्लीम समाज बांधव या वेळी मोठया संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.