महाराष्ट्र

सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची कृषिमंत्र्यांनी केली पाहणी

सेलू (प्रतिनिधी)
मागील दोन दिवस सततच्या अतिवृष्टीमुळे सेलू तालुक्यात झालेल्या शेतीचे,पिकांचे, पशुधनाचे, शेती अवजार,आणि घरांच्या पडझडीच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करण्याकरता महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार धनंजय जी मुंडे साहेब यांनी सेलू तालुक्याचा पाहणी दौरा केला यावेळी जिंतूर सेलू तालुक्याचे आमदार मेघना दीदी साकोरे बोर्डीकर उपस्थित होते. यावेळी ढेंगळी पिंपळगाव येथे शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन त्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या नुकसान झालेल्या शेतीचे आणि पिकांचे पाहणी केली यावेळी तालुक्याच्या विकासरत्न आमदार सौ मेघनादिदी बोर्डीकर यांनी तालुक्यात झालेले शेतकऱ्यांचे पशुधनाचे शेतीचे आणि घरांचे पडझड नुकसान भरपूर प्रमाणात झाली आहे असे कळवले . यावेळी महसूल खाते कृषी खाते पंचायत समिती अशा सर्व विभागातील अधिकारी वर्ग उपस्थित होते यावेळी धनंजय मुंडे साहेबांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला लवकरच नुकसान भरपाई मिळेल शासन आपल्या बाबतीत संवेदनशील आहे कोणीही काळजी करायची गरज नाही तसेच तालुकाच्या आमदारही मेघना दीदी आपल्या सर्वांच्या मदतीसाठी नेहमीच अग्रेसर असतात असे प्रतिपादनही केले. यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष दत्ता कदम,रवींद्र जी डासाळकर, उपजिल्हाध्यक्ष माऊली ताठे,शहराध्यक्ष अशोकजी अंभोरे, अनिल पवार,अशोक ताटे ,महेश टाके, भास्कर आबा पडघन, केशव सोळंके,पांडू तात्या सोळंके, मुंजाभाऊ हरकळ, बाळासाहेब आघाव,कृष्णा शेरे, केदारेश्वर मोगल,प्रकाश गजमल,भगवान भाई डक, सुंदर बरसाले, नारायण डोंबे,संदीप घुगे, गुलाबराव रोडगे आधी जन पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button