जिल्हास्तरीय शालेय मलखांब स्पर्धेत पूर्णा येथील विद्यार्थ्यांचे यश
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा क्रीडा संकुल परभणी येथे घेण्यात आलेल्या. शालेय जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत विद्याप्रसारणी सभेचे हायस्कूल पूर्णा मधील खेळाडूंनी विजय संपादन केला. विजय खेळाडूची विभागीय पातळीवर शालेय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संस्था अध्यक्ष डॉ. दत्तात्रय वाघमारे विजयकुमार रुद्रवार ,भीमरावजी कदम श्रीनिवासजी काबरा,उत्तमरावजी कदम , मुख्याध्यापक देविदास उमाटे व शिवदर्शन हिंगणे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी खेळाडूस शुभेच्छा दिल्या
या स्पर्धेत आयुष अनिल काळे, तेजस संतोष क काळे, प्रतीक केशव गायकवाड, सुशांत काशिनाथ काटे सुबोध सुभाष कापुरे यांनी विजय संपादित केला. खेळाडूस क्रीडा शिक्षक प्रकाश रवंदळे, सज्जन जयस्वाल व गौतम मुळे यांचे मार्गदर्शन लाभले.