सेलू,(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई तर्फे बुधवारपासून (२५ सप्टेंबर) शासकीय रेखाकला एलिमेंटरी, इंटरमीजिएट ग्रेड परीक्षेला सुरुवात झाली. परीक्षेस बुधवारी एलिमेंटरी परीक्षेचे वस्तुचित्र व स्मरणचित्र असे दोन पेपर घेण्यात आले.
सेलू येथील नूतन विद्यालय केंद्रावर एलिमेंटरी परीक्षेसाठी १६८, तर इंटरमीजिएट परीक्षेसाठी ५४ विद्यार्थी आहेत. केंद्रप्रमुख म्हणून मुख्याध्यपक संतोष पाटील, तर सहकेंद्रप्रमुख म्हणून कलाशिक्षक आर. डी. कटारे, सहाय्यक फुलसिंग गावीत काम पाहात आहेत. परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून एम. जे. वाघमारे, एन.व्ही चव्हाण, जी. आर. मुळी, बी. एम. गोरे, एस.ए. शेरे, आर. बी. रोकडे एस. ए. सूर्यवंशी, पांडुरंग पाटणकर, माधुरी कुंभार, तर सहाय्यक म्हणून केशव डहाळे, अरुण रामपूरकर काम पाहात आहेत. केंद्रप्रमुख संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे यांनी परीक्षेला भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
” दरम्यान, एलिमेंटरी, इंटरमीजिएट अशा दोन्ही परिक्षेसाठी या वर्षी सात लाख ५० हजार ९३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दहावी शिक्षक मंडळाच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेत श्रेणीनुसार सवलतीचे गुण दिले जातात. या वर्षी कला संचालनालयातर्फे शासकीय रेखाकला परीक्षा २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान होत आहेत.”