पूर्णा पोलीसानी कार मध्ये आलेला गुटखा पकडला
पूर्णा पोलीसानी कार मध्ये आलेला गुटखा पकडला
पूर्णा(प्रतिनिधी)रात्री गस्त घालणाऱ्या स्थानिक पोलिसांनी एका कार मध्ये आलेला अवैध गुटखा पकडून कार सह गुटखा मिळुन एकूण 4 लाख11हजार 880 रु मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे
पोलिस सुत्रा कडून मिळालेल्या माहिती नुसार दि 25 सप्टेंबर रोजी गस्त घालणाऱ्या स्थानिक पोलिसाना गोपनीय खबरदारी कडुन माहिती मिळाली की गवळी गल्लीत एका कार मध्ये अवैध गुटखा येत आहे त्या नुसार पोलीसानी मध्यरात्री गवळी गल्ली येथे जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी कार क्र एम एच 17 बी व्ही 4373 उभी असून त्या ठिकाणी दोन इसम बोलताना दिसले आणि ते दोन्ही इसम पोलीसना पाहून पळून गेला तेव्हा गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पंचा समक्ष कारची झडती घेतली असता कार मध्ये तीन पोत्यात विमल नावाचा गुटख्याचे 60 पुढे सापडले त्याची अंदाजे किंमत 11,880 रु आणि कारची किंमत 4 लाख रु असे दोन्ही मिळून 4,11880 रु चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी बिट जमादार मनोज नळगीरकर यांच्या फिर्यादी वरून अज्ञात दोन इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.