तात्काळ कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करा
अखिल भारतीय शिवस्वराज्य सेना जिल्हा परभणी च्या वतीने मागणी
परभणी (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांची तत्काळ कर्जमाफी करून सातबारा कोरा करून द्यावा अशी मागणी अखिल भारतीय शिवस्वराज्य सेना च्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला पाठवलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्यात सध्या मोसमी पाऊस पडला असून कुठे जास्त प्रमाणात तर कुठे अतिशय अल्प प्रमाणात पाऊस पडल्या मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
देशाचा आर्थिक कणा समजला जाणारा शेतकरी त्यामुळे संकटात सापडला असल्याने राज्य शासनाने कोणताही दुजाभाव न करता सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकरी बांधवांचा सातबारा तत्काळ कोरा करून द्यावा अशी मागणी मागणीची करण्यात आली आहे. या मागणीची तात्काळ दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा अखिल भारतीय शिवस्वराज्य सेना परभणी जिल्हा महिला अध्यक्ष शितल कदम यांनी दिला आहे.