परभणी (प्रतिनिधी)
मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात अब्दुल रहमान खान
चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने शालेय गणवेश वाटप कार्यक्रम बुधवार 25 सप्टेंबर रोजी घेण्यात आला. सदरील कार्यक्रमात ज्येष्ठ काँग्रेस नेते इरफान उर रहमान खान, इमरान उर रहमान खान, नयीम पठाण, नझीर शेख, अहजम खान आणि डॉ. अफवान खान यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात शाळेतील 200 विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. डॉ अफवान खान यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.