आखाडा बाळापूर पोलिसांच्या समुपदेशनानंतर जुळला संसार
आखाडा बाळापूर (प्रतिनिधी)
आखाडा बाळापूर पोलिसांच्या समुपदेशनानंतर पती- पत्नीमधील गैरसमज दूर करून त्यांच्या संसारावेली जुळविण्यात पोलिसांना यश आले आहे. कळमनुरी तालुक्यातील कानेगाव येथील बेबीनंदा पाईकराव यांचा विवाह कळमनुरी येथील इंदिरानगर भागातील मिलिंद पाईकराव यांच्यासोबत झाला होता सुखाचा संसार सुरू असलेल्या जोडप्याला एक मुलगा व एक मुलगी झालीमुलगा सध्या पंधरा वर्षाचा असून मुलगी पाच वर्षाची आहे.मात्र काही दिवसापूर्वीच किरकोळ कारणावरून दोघांमध्ये गैरसमज निर्माण झाले त्यामुळे दोन वर्षापासून दोघेही विभक्त झाले होते त्यामुळे मुलांची चांगलीच संभ्रमावस्था निर्माण झाली होती या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुटे जमादार रामदास ग्यादलवाड, राजीव जाधव, शिवाजी पवार, महिला पोलीस कर्मचारी सुनीता धुळे यांनी पाईकराव दाम्पत्याला आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात बोलावले त्यानंतर दोघांशी चर्चा केली मात्र केवळ किरकोळ गैरसमजांमधून त्यांच्या मध्ये बेबनाव झाल्याची स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना समोरासमोर बसवून त्यांच्यातील गैरसमज दूर केले त्यानंतर दोघांनीही एकत्र येण्याचा निर्णय घेतला पोलिसांनी दोघांच्या निर्णयाचे कौतुक करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या पोलिसांच्या पुढाकारातून दोघांच्या संसार वेली पुन्हा फुलल्या आहेत.