पालम (प्रतिनिधी) येथील पोलिसांच्या पथकाने रविवार 29 सप्टेंबर एका घरात साठवून ठेवलेला गुटख्याचा साठा जप्त केला आहे.या कारवाईत एकूण 23 हजार 400 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला पालम तालुक्यातील चाटोरी या गावात गुटखा एका घरात विक्रीसाठी गुटखा साठवून ठेवले असल्याबाबत माहिती मिळाली. या माहितीवरुन पोलीस पथकाने छापा टाकत विमल पान मसाला, तंबाखु व इतर प्रतिबंधित गुटखा जप्त केला. सदर प्रकरणी पोह. कोलमवाड यांच्या फिर्यादीवरुन अविनाश त्र्यंबकराव गव्हाणे याच्यावर गुन्ह्याची नोंद झाली आहे. तपास सपोनि. दोनकलवार करत आहे.
Related Articles
Check Also
Close